marathi actress sukhada khandkekar undergoes ligament surgery walk with a walker
Follow Us:अभिनेता अभिजित खांडकेकरची पत्नी आणि प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री सुखदा खांडकेकर सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. तिला तिची एक साधी चुक फार महागात पडली आहे. सुखदा खांडेकर ही एक प्रसिद्ध अभिनेत्री असून ती एक नृत्यंगना सुद्धा आहे. अभिनेत्री अनेकदा इन्स्टाग्रामवर क्लासिकल डान्सच्या व्हिडिओही शेअर करताना दिसते. काही तासांपूर्वीच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केलेली आहे. ज्यामध्ये तिला एका शारीरिक त्रासाला सामोरं जावं लागल्याचं ती म्हणाली आहे. नाचताना अचानक अभिनेत्रीच्या गुडघ्याला दुखापत झाल्याने तिला मोठ्या ऑपरेशनला सामोरं जावं लागलं.
काजोल च्या ‘माँ’ चित्रपटाबाबत समोर आले अपडेट, जाणून घ्या ओटीटीवर कधी आणि कुठे होणार रिलीज?
अभिनेत्री सुखदा खांडेकरने एक हॉस्पिटलमधला व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना अभिनेत्रीने पोस्टमध्ये लिहिलेय की, “कहाknee (गुडघा) में ट्विस्ट, या घटनेला आज दोन महिने झाले. आराम कोणाला आवडत नाही? पण कम्पल्सरी आराम, नको रे बाबा… नाचताना एकदा गुडघा ट्विस्ट झाल्याच निमित्त झालं आणि २९ एप्रिल २०२५ रोजी डायरेक्ट ऑपरेशन करून आराम करायला मी खऱ्या अर्थाने एका पायावर तयार झाले. खरतर लिगामेंट टेअरच्या ऑपरेशन नंतर किमान ३ महिने आराम, फिजिओथेरेपी आणि हळू हळू रिकवरी अपेक्षित असते. पण मी तर २ महिन्यानंतरचा कार्यक्रम घेऊन ठेवला होता, तोही नाच आणि थेट युरोपियन मराठी संमेलन, लेस्टर मध्ये! मग मनाचा हिय्या करून छान लवकर बरं व्हायचं असा चंग च बांधला. बसून वजन वाढू नये म्हणून योग्य डाइट, फिजिओथेरेपी, बरोबरंच मनाचा निश्चय किती महत्त्वाचा असतो हे ह्या निमित्ताने पुन्हा लक्षात आलं. One day at a time म्हणत छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मानत मी जिद्दीने माझे प्रयत्न सुरू ठेवले. ह्या संपूर्ण काळात माझी आई, माझा नवरा अभिजीत, देवेंद्र पेम दादा आणि दिनेश लाड ज्यांनी डॉक्टर शोधण्यापासून, लवकरात लवकर अपॉईंटमेंट मिळवुन देण्यापर्यंत सगळं केलं. माझे डॉक्टर चिंतन हेगडे, माझी फिजियोथेरेपिस्ट डॉक्टर साक्षी, माझी ट्रेनर, माझे मित्र- मैत्रिणी आणि माझा नवीन मित्रच झालेल्या वॉकरने खूप साथ दिली. युरोपियन मराठी संमेलन हा कार्यक्रम आयोजित करणाऱ्या इव्हेंट ऑर्गनायझर अमोलचे विशेष आभार, माझ्यावर विश्वास ठेवला, मला कॉरिओग्राफीमध्ये पूर्णपणे साथ दिली. कॉरिओग्राफर अतुल कुलकर्णी आणि ईशानने जमतील अशा स्टेप्स बसवून काम जरा सोप केल. तिथल्या स्थानिक कलाकारांचे आभार, ज्यांनी मला मोलाची साथ दिली. आणि अखेर २ महिन्यांच्या विश्रांती नंतर प्रत्येक नर्तिकेला, अभिनेत्रीला ज्याची ओढ असते त्या रंगभूमीवर पुन्हा दमदार पाऊल टाकलं. हे सगळं सविस्तर लिहायचं कारण माझं कौतुक नसून माझा प्रयत्न आहे… अश्या सगळ्यांपर्यंत हा संदेश पोहोचवायचा की तुम्ही मनात आणला तर तुम्हाला काहीही, कोणीही रोखू शकत नाही. मग शारीरिक आजार असो किंवा मानसिक, फक्त मनात ठरवता आलं पाहिजे मग… sky is the limit!”
View this post on Instagram
A post shared by Sukhada Khandkekar (@morpankh)
लग्न टिकवण्यासाठी शर्मिला टागोर यांनी मुलीला दिलेला मोलाचा सल्ला, सोहा अली खानने सांगितले गुपित…
Web Title: Marathi actress sukhada khandkekar shares health update after knee ligament surgery Get Latest Marathi News , Maharashtra News and Marathi News from Politics, Election News , Sports News , Entertainment News, Business News and Religion News only on Narashtra.com