赛派号

男生内裤有什么款式 पवनानगरमधील संकल्प इंग्लिश स्कूलमध्ये विज्ञान दिन साजरा, विद्यार्थ्यांच्या कल्पकतेतून विविध विज्ञान प्रकल्प सादर

आजचे विद्यार्थी हे उद्याच्या विकसित भारताचे भविष्य आहे. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती, राष्ट्रीय एकात्मता, सर्वधर्म समभाव अशी मूल्ये जोपासत असताना त्यांच्यातील वैज्ञानिक दृष्टिकोन देखील जोपासणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी देखील देशाच्या वैज्ञानिक क्षेत्रात आपला ठसा उमटवणे गरजेचे आहे, असे मत संकल्प शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सचिव लक्ष्मण भालेराव यांनी व्यक्त केले. संकल्प शिक्षण प्रसारक मंडळ संचलित संकल्प इंग्लिश स्कूल पवनानगर येथील विज्ञान प्रदर्शनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. ( Science Project Exhibition at Sankalp English School Pananagar on the occasion of National Science Day 28 February )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

राष्ट्रीय विज्ञान दिनाचे (28 फेब्रुवारी) औचित्य साधून विद्यालयात विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन संकल्प शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय कालेकर, संस्थापक सचिव लक्ष्मण भालेराव, उपाध्यक्ष पोपटशेठ कालेकर, काले गावचे सरपंच खंडू शेठ कालेकर, मंडल अधिकारी प्रकाश बलकवडे, पोलिस पाटील सीमा यादव, शिक्षक पतसंस्थेचे संचालक नितीन वाघमारे, देवीदास कालेकर, अरविंद रोकडे, शरद सोनवणे, मुख्याध्यापक राहुल सोनवणे आणि पालकांच्या उपस्थितीत करण्यात आले.

विद्यार्थ्यांनी यावेळी विविध प्रकल्प सादर केले. त्यामधे प्रामुख्याने जलचक्र, रेनवॉटर हार्वेस्टिंग, हायड्रॉलिक वेट लिफ्टिंग, वातावरण बदल, लिफ्ट, चिली कटर, शहर आणि ग्रामीण भागातील फरक, होलोग्राम, विंडमिल, जल शुद्धीकरण, आकाशगंगा, इलेक्ट्रॉनिक्स बेल, डे नाइट, टाईप ऑफ हाऊस, व्हॅक्युम क्लिनर असे विविध प्रोजेक्ट विद्यार्थ्यांनी सादर केले.

हेही वाचा – वडगाव शहरात सामान्यांसाठी ग्रंथालय, मराठीतील दर्जेदार पुस्तके मोफत वाचता येणार, नगराध्यक्ष ढोरेंचा स्तुत्य उपक्रम

कार्यक्रम यशस्वितेसाठी मुख्याध्यापक राहुल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली विज्ञान विभाग प्रमुख मीनाक्षी शिवणेकर, नीता कालेकर, सोनल गांधी, बाळू कदम, कैलास येवले, प्रियांका येवले, वैष्णवी काळे, सुजाता वाघेरे, आशा बोरकर, निकिता कालेकर आणि सर्व विद्यार्थ्यांनी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक राहुल सोनवणे यांनी तर आभार उपमुख्याध्यापिका नीता कालेकर यांनी मानले.

अधिक वाचा –

– माजी आमदार स्व. दिगंबर दादा भेगडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ रविंद्र भेगडेंकडून दिवड येथील शाळेच्या इमारतीसाठी मोलाची मदत – श्री एकविरा देवस्थान ट्रस्ट निवडणूकीचा निकाल जाहीर, अत्यंत चुरशीच्या लढतीत ‘यांनी’ मारली बाजी, वाचा निकाल सविस्तर

dainik mal jahirat

版权声明:本文内容由互联网用户自发贡献,该文观点仅代表作者本人。本站仅提供信息存储空间服务,不拥有所有权,不承担相关法律责任。如发现本站有涉嫌抄袭侵权/违法违规的内容, 请发送邮件至lsinopec@gmail.com举报,一经查实,本站将立刻删除。

上一篇 没有了

下一篇没有了